‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज
अप्सरा आली’ आणि ‘वाजले की बारा’ म्हणत रसिक पे्रक्षकांना आपल्या मधाळ आवाजाने घायाळ करणारी गायिका बेला शेंडे आता ‘रज्जो’मधून बॉलीवूडसह देशभरातील रसिकांना घायाळ करत आहे. ‘रज्जो’ चित्रपटातील ‘जुल्मी रे जुल्मी’ हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं असून बेलाच्या आवाजाला रसिकांनी पसंतीची पावती दिली आहे. देव कोहली यांनी लिहिलेल्या या गीताला ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचं संगीत लाभलं आहे. सुप्रसिध्द कादंबरीकार विश्वास पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘रज्जो’च्या निमित्ताने एक आगळी -वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘रज्जो’च्या मध्यवर्ता भूमिकेतल्या कंगना राणावतसह पारस अरोरा, महेश मांजरेकर, प्रकाश राज, जयाप्रदा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटातील ‘जुल्मी रे जुल्मी उचट गई निंदिया’ हे गाणं अल्पावधीतच तुफान लोकप्रिय झालं आहे. टिव्ही, रेडिओ एफ.एम. सोबतच युटयुब, फेसबुक आणि सोशल नेटवर्क साईट्सवर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विविध संगीत वाहिन्यांवरून आणि एफ.एम. वरून ही गाणी सतत वाजत असल्यामुळे रसिकांच्या ओठांवर ती सहज रूळताहेत. ‘जुल्मी रे जुल्मी’ या गाण्याला असाच देश-विदेशातून भन्नाट प्रतिसाद मिळतोय.‘दिल तो पागल है’, ‘दुश्मन’, ‘गदर’ या चित्रपटांनंतर संगीतकार उत्तम सिंग यांच्या ‘रज्जो’मधील हे गाणं बेलासाठी एक मोठा बे्रक ठरला असून यासोबतच चित्रपटातील ‘कैसे मिलूं मै पिया’, ‘कलेजा है हाजिर’, ‘मेरे घुंगरू’ ही वेगळ्या धाटणीची गाणीही बेला शेंडेने गायली आहेत. फोर पिलर एण्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘रज्जो’ चं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील यांचं आहे. येत्या 15 नोव्हेंबरला ‘रज्जो’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
0 comments:
Post a Comment